Home | Results | Syllabus 

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

NOTICE BOARD

प्रस्तावना

तंत्र शिक्षणाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे व प्रसारामुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय सुविधे साठी १९८६ मध्ये व्यवसाय प्रमाण पत्र  अभ्यास क्रमाच्या अंमलबजावणीसाठी व्यवसाय शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात आली .वाढते अद्योगीकरण , बदलते तंत्रज्ञान ,सामाजिक आणि आर्थिक बदल यांचा विचार करता रोजगार व स्वयंरोजगार यांना चालना मिळण्याच्या दृष्टीने कुशल / अर्धकुशल स्वरूपाची व्यवसाय शिक्षणाची गरज निर्माण होत आहे .तंत्र व व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडालातर्फे अल्प मुदतीचे दैनंदिन जीवनावश्यक अश्या विषयाचे प्रशिक्षण देऊन स्वबळावर रोजगार निर्माण करण्याचे उद्धिष्ठ विद्यार्थ्यान समोर ठेवण्यात आले आहे .उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन ह्यांच्या नियंत्रणाखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील या मंडळाचे कार्यक्षेत्र राज्यस्थरीय असून सहार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण , प्रादेशिक कार्यालय व प्रत्येक जिल्हा स्थरावर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी ह्यांचे कार्यालामार्फत मंडळाचे कामकाज चालते.सध्या ह्या मंडळाचे कार्यालय शासकीय तंत्रनिकेतन इमारत , दुसरा मजला , ४९ , खेरवाडी , अलियावर जंग मार्ग ,वांद्रे (पूर्व ),मुंबई - ५१ येथे कार्यारत आहे .


व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची कार्ये

१. मंडळाकडे सोपविलेल्या निरनिराळ्या प्रमाणपत्र  परीक्षा व व्यवसाय परीक्षा यासाठी अभ्यासक्रम ठरविणे व त्यानुसार परीक्षा घेणे .

२. परीक्षा घेण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करणे .

३. परीक्षेचे निकाल जाहीर करून अंतिम परीक्षेचे यशस्वी विध्यार्थ्यांना शासनाच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करणे ..

४. मंडळाने ठरविलेले अभ्यासक्रम शिकविण्यासाठी इच्छुक शैक्षणिक संस्थांना मान्यता देणे .

५. विविध व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमानसाठी पाठ्यपुस्तके / संधर्भ पुस्तके / दृकश्राव्य साधने ठरविणे.साधने व उपकरणे यांची यादी तयार करणे .अभ्यासक्रम शिकवण्यासाठीने मावयाच्या शिक्षकांची किमान शैक्षणिक आर्यता .

६.विविध व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे आवशक्यतेनुसार पाठ्यक्रम तयार करणे , त्यात सुधारणा करणे आणि उपरोक्त प्रकरणी आवश्यक त्या शिफारशी करण्यासाठी अभ्यास मंडळे व आवशक्यतेनुसार  उपसमित्या नेमून योग्य ते कार्यवाही करणे .

QUICK LINKS
» Program Curriculum
» Our Inspiration
» Amenities
» MSBVE Publication
» MSBVE Staff
» Photo Gallery
» Academics
» Events
» Achievements
» MSBVE in Media
Home | About Us | Contact Us
Copyright © MSBVEE 2010.